SBI Internet Banking

SBI Internet Banking




                               


SBI Internet Banking
 
 

                                                कॅशलेस व्यवहाराला सुरवात झालेली आहे. डिजिटल भारत बनवण्यात आपला सहभाग अतिशय महत्वाचा आहे. आपणास  Online Internet Banking  ची सुरवात कशी करावी याबाबत ब-याच शिक्षकांनी विचारणा केली होती आज याविषयी पोस्ट बनवून टाकत आहे. Online Internet Banking सुविधा दोन प्रकारे सुरु करता येते. एक म्हणजे प्रत्यक्ष बँकेत जाऊन Online Internet Banking चा फॉर्म भरुन आपणास Online Internet Banking ची किट दिली जाते. दुसरी पध्दत म्हणजे आपल्या ATM चा ल पासबुकचा वापर करुन बँकेत न जाता आपण घरी आपण Online Internet Banking सुरु करु शकतो.
                आपण दुस-या प्रकारे Online Internet Banking कशी सुरवात करावयाची ते पाहणार आहोत. सध्या बँकेतील कामे व गर्दी पाहता हा दुसरा पर्याय खूप सुलभ व चांगला आहे.
आवश्क बाबीः-
                                ०१) आपले एसबीआय  बँकेत खाते असणे आवश्क आहे.
                                ०२) बँक पासबुक असावे.
                                ०३) आपला मोबाईल आपल्या खात्याशी जोडलेला असावा.
                                ०४) ATM कार्ड असावे.
Online Internet Banking ची सुरवात करताना खालिल कृती क्रमाने करा.
०१) प्रथम आपण संगणकावर आपले वेब बाऊझर ओपन करा व त्यामध्ये www.onlinesbi.com अशी बेव साईट टाका व सर्च करा आपणासमोर खालिल प्रमाणे पेज Open होईल.त्या पेजमधाल Personal Banking वर क्लिक करावे.
०२) त्यानंतर आपल्या समोर Retil.onlinesbi.com चे पेज ओपन होईल त्यामधील Continue to Login वर क्लिक करावे .
०३) Continue to Login वर क्लिक केल्यावर आपण   Sbi  Internet Banking च्या पेजवर जाल त्यावरिल New User Register here वर क्लिक करावे.

०४) New User Register here वर क्लिक केल्यावर आपणास एक संदेश वजा सुचना विचारली जाईल त्याला OK करावे.
०५) त्यानंतर आपणासमोर एक फॉर्म ओपन होईल ज्यामध्ये आपणास माहिती भरावयाची आहे व ती सर्व माहिती आपल्या खाते पासबुक मध्ये उपल्बध आहे. खालिल माहिती भरावी.
अ) खाते नंबरः- आपला खाते नंबर येथे टाकावा.
ब) CIF नंबरः- आपल्या खाते पासबुक वर असलेला CIF नंबर येथे टाकावा.खाते नंबरच्या खाली असतो.
क) बँच कोडः- आपले खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेचा कोड येथे टाकावा. आपण तेथून शोधू शकतो.
ड) देशः- आपला देश निवडावा.
इ) मोबाईल नंबरः- या ठिकाणी रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकावा.
ई) ट्राजेक्शन राईटसः- या ठिकाणी आपण Full transaction Rights हा पर्याय निवडावा.
उ) समोर दिसणारी टेक्स टाकावी.
ऊ) शेवटी सबमीट वर क्लिक करावे.
०६) जसे आपण सबमीट बटणावर क्लिक कराल तसे आपणाल एक One time Password (OPT) आपल्या रजिस्टर्ड मोबाईल वर येईल तो इथे टाकावा.व confirm करावे.
०७) OTP  टाकून confirm  केल्यानंतर आपणासमोर खालिल  पेज येईल त्या मधील पहिला पर्याय  
 (I Have My ATM Card) निवडून सबमिट करावे .
०८) त्यानंतर आपल्या समोर खालिलप्रमाणे एक पेज येईल ज्या मध्ये आपल्यला आपल्या ATM कार्ड वरिल माहिती भरावयाची आहे तसेच आपल्या खात्यातून १ रुपया चार्ज केला जाईल. या पेज मध्ये खालिल माहिती  भरावी.
अ) कार्ड नंबरः- आपल्या कार्डच्या समोरील बाजूस असलेला १६ अंकी कार्ड नंबर येथे भरावा.
ब) कार्ड इक्सपायरी डेटः- येथे Valid up हि माहिती निवडावी.
ड) कार्ड धारकाचे नावः- यामध्ये जसे कार्डवर नाव आहे तसेच टाकावे.
इ)ATM PIN- या ठिकाणी आपला ATM PIN नंबर टाकावा.
ई) खालिल अक्षरे पाहून येथे टाकावीत (कँप्च्या कोड)  अक्षरे येथे टाकावीत.व सबमीट करावे.
०९) त्यानंतर आपणासमोर खालिल विन्डो ओपन होईल त्यामधील Pay बटणावर क्लिक करावे.

१०)  Pay बटणावर क्लिक केल्यानंतर आपणासमोर खालिल पेज येईल त्यामध्ये आपला तात्पुरता युझर आयडी असेल तो लिहून घ्यायला विसरु नका. व खालिल रकान्यामधे तात्पुरता Login Password टाकावा तो देखील लिहून घ्यावा. शेवटी सबमीट वर क्लिक करावे.
११) त्यानंतर आपण यशस्वी नोंदणी केल्याचा संदेश असलेले पेज येईल.ते खालिल प्रमाणे असेल.
१२) परत आपण www.retall.onlinesbi.com  वर क्लिक करु आपला User Id जो आपण लिहून घेतला असेल व आपला Login Password येथे टाकावा. व Login करावे त्यानंतर आपणास आपला Login Id Password बदलून घ्यावयाचा असतो तो बदलू घ्या प्रोफाईल Password देखील बनवून घ्या व आपण टाकत असलेले Password लक्षात असू द्या.

No comments:

Post a Comment